दया..कुछ तो गडबड जरूर है.;अनिल देशमुख यांच्या विरोधात FIR दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी CBI वर साधला निशाणा
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच देशमुख यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यासह अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी सीबीआयने देशमुख यांची 11 तास चौकशी केली होती. देशमुख यांच्या व्यतिरिक्त काही अज्ञात लोकांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयकडून काही ठिकाणी तपासणी सुद्धा करत आहे. सीबीआय ज्या ठिकाणी तपास करत आहे त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या घराचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आता संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी एक ट्विट सुद्धा केले असून त्यात असे म्हटले आहे की, काहीतरी गडबड आहे. मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुख यांच्यावर धाडी,एफआयआर वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही आहे. त्यामुळे काहीतरी गडबड जरुर आहे.
कुछ तो गडबड है…
मा.उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असे सीबीआयला सांगीतले होते.
अनिल देशमुखावर धाडी. एफ.आय. आर..वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही.दया..कुछ तो गडबड जरूर है.— Sanjay Raut (@rautsanjay61) April 24, 2021
दरम्यान , संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटले , ‘सीबीआयचा एक अजेंडा आहे. यासोबतच न्यायालयाचा आदेश आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. अनिल देशमुखांनी आपली बाजू सीबीआयकडे मांडली आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचे ते बघू असे राऊत म्हणाले. तसेच सीबीआयने आपले काम केले, न्यायालयानेही आपले काम केले. आता महाविकास आघाडी आपले काम करत आहे.
तसेच नवाब मलिक यांनी सुद्धा सीबीआयवर निशाणा साधला आहे. त्यांनी सीबीआयला काही प्रश्न विचारले आहेत. त्यानुसार त्यांनी कोर्टात रिपोर्ट दाखल केला? कोर्टाने FIR दाखल करण्यास सांगितला का? या बद्दल कोणतीच माहिती नाही आहे. अनिल देशमुख यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. आज ठिकठिकाणी छापेमारी केली जात असल्याची बाब समोर येत आहे. तसेच अँटेलिया प्रकरणी सचिन वाझे कोणच्या सांगण्यावरुन काम करत होते ते अद्याप सांगण्यात आलेले नाही. अनिल देशमुख यांच्यासह सरकारला बदनाम करण्याचा हा कट आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी पोलीस बंदोबस्तात वाढ
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अनिल देशमुख हे सध्या नागपुरातच मुक्कामी आहेत. माजी पोलिस आयुक्त परमविर सिंह यांच्या आरोपांवर चौकशी करणार्या सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानासह राज्यातील 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपुरातील निवासस्थानी सीबीआयचे पथक पोहोचले की नाही याबाबत अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 24, 2021, 4:15 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY