Breaking News

स्थलांतरित मजूरांचा देवदूत झाला कोरोनामुक्त, पुन्हा मदतीची मोहीम सुरू ; म्हणाला, देशभक्ती दाखवण्याची योग्य वेळ

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 24, 2021 2:06 pm
|

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यास मदतीचा हात देणाऱ्या सोनू सूदने काही दिवसांपूर्वीच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. याची माहिती त्याच्या चाहत्यांना मिळताच अनेकांनी सोनूच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. पण, आता सोनूच्या चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण कोरोनाच्या संसर्गातून तो मुक्त झाला आहे. याबाबतची माहिती चाहत्यांना खुद्द सोनू सूदनेच ट्विट करत दिली. या फोटोमध्ये त्याने मास्क परिधान केला आहे. तसेच हाताने निगेटिव्ह साईन करत पोझ दिली आहे. त्याने या फोटोला ‘कोरोना अहवाल निगेटिव्ह आला’ असे कॅप्शनही दिले आहे. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे कळताच सोनूनेची ही आनंदवार्ता सर्वांशीच शेअर केली.तर अभिनेत्री सोनल चौहानने म्हटले ही आजची , ‘बेस्ट न्यूज.’

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोनू सूद घरीच क्वारंटाइन होता. याकाळात त्याने लोकांच्या मदतीसाठी सतत काम करत होता. सोनू आणि त्याची टीम गरजूंना औषधे, बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवत आहेत. मात्र, जेवढ्या लोकांनी मदतीसाठी कॉल केले, त्यापैकी काही जणांनाच तो याकाळात मदत करु शकतोय, अशी खंत देखील त्याने व्यक्त केली आहे.

सोनूंकडे मदत मागणाऱ्याला म्हणाला- तुमचं मूल ही आमची जबाबदारी

दरम्यान , कोरोनाच्या काळात देवदूतासारखा मदतीला धावणाऱ्या अभिनेता सोनू सूदने स्वत: कोरोनातून वाचल्यानंतर पुन्हा एकदा मदतीची मोहीम सुरू केली आहे.ट्विटरवरून मदत मागणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला नागपुरातून थेट हैदराबादला एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. नागपुरातील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या मुलाला कोरोनाची बाधा झाली.सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने त्याला ट्विटरवर ट्विट करून म्हटले की, ‘मी तुमचा मोठा चाहता आहे. माझ्या 7 महिनाच्या नवजात मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे.त्याच्या फुप्फुसांमध्ये ८५ ते ९० टक्के संसर्ग झाला. मी इतके पसे खर्च करू शकत नाही कृपया मदत करा. ‘ त्याच बरोबर , यूजरने आपल्या बाळाचा व्हिडिओ देखील शेअर केला.याला उत्तर देताना सोनूने शुक्रवारी लिहिले की, ‘मी माझ्यापरीने जे काही करता येईल तितकी मदत केली जाईल. आता तुमच्या आपल्या मुलाची जबाबदारी आमची आहे.यानंतर सोनू सूदने त्वरित सूत्रे हलविली. अगोदर त्याला नागपुरातील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले; परंतु तिची स्थिती पाहता तातडीने फुप्फुसाचे प्रत्यारोपण करावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.त्यानंतर सोनू सूदने हैदराबाद येथील एका मोठ्या इस्पितळात तिला एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था केली. त्या इस्पितळात ईसीएमओ म्हणजेच फुप्फुसांवरील ताण हटविण्यासाठी रक्त कृत्रिमपणे शरीरात टाकण्याची व्यवस्था आहे.

‘खास’ लोकांसाठी हा संदेश

ोनू सूद यांनी आणखी एक ट्विट केले ज्यामध्ये म्हटले की, केवळ ‘खास’ लोकांसाठी हा संदेश आहे. अभिनेत्याने म्हटले आहे की, ’15 ऑगस्ट रोजी देशभक्ती दर्शविणाऱ्यासाठी हे संदेश आहे ; जर देशासाठी काहीतरी करण्याची आणि देशभक्ती दाखविण्यासाठी यापेक्षा चागंली संधी भविष्यात कधीच येणार नाही .


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 24, 2021, 2:06 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *