CoronaVirus Mumbai Updates : मुंबईत वाहनांसाठी लागू असलेली कलर कोड पद्धत रद्द; 7 दिवसात निर्णय का घेतला मागे -वाचा
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांअंतर्गत विविध सेवांच्या वाहनांचा समावेश ठराविक प्रवर्गांमध्ये करत त्यांच्यावर लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचे स्टीकर लावण्याचा नियम मुंबई पोलिसांकडून लागू करण्यात आला होता. पण, हा नियम आता 7 दिवसात मागे घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांकडूनच देण्यात आली आहे.
वाहनांवर यापुढे रंगीत स्टीकर लावण्याचा नियम बंधनकारक नसला तरीही वाहनांची तपासणी मात्र सुरुच राहणार आहे. लॉकडाऊनचे नियम लागू होताच, वाहनांच्या ये-जा करण्यावर आलेल्या निर्बंधांअंर्गत काही वाहनांना यातून वगळत त्यांना स्टीकर लावण्याचे निर्देश दिले होते.
Dear Mumbaikars.The red, yellow, green #EmergencyStickers categorisation is being discontinued. However, thorough checks shall continue & we hope you will stand by us in #TakingOnCorona & avoid all non-essential / non-emergency movement outside home #StayHomeStaySafe
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) April 23, 2021
पोलिसांनी लागू केलेल्या या अटीअंतर्गत लाल रंगाच्या स्टीकरची अट डॉक्टर, वैद्यकिय कर्मचारी, रुग्णवाहिका, वैद्यकिय मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना होती. तर, हिरव्या रंगाचे स्टिकर खाद्यपदार्थ, भाज्या, फळं, किराणा सामान, दुग्धजन्य पदार्थांची उत्पादनं यांसाठीच्या वाहनांवर बंधनकारक होते. या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवांमध्ये येणारे कर्मचारी ज्यांमध्ये नगरपालिका अधिकारी, वीज पुरवठा विभागातील कर्मचारी, बँक कर्मचारी, वकील, माध्यम प्रतिनिधी आणि दुरसंचार विभागात काम करणाऱ्यांनी आपल्या वाहनांवर पिवळ्या रंगाचा स्टिकर लावणे अपेक्षित होते.
स्टिकरच्या या नियमासाठी मुंबई पोलीस आग्रही दिसत होते. काही ठिकाणी खुद्द पोलिसांनीच हे स्टिकर वितरितही केले होते. पण, याच मुद्द्यावरुन नागरिकांमध्ये कमालीचा संभ्रम दिसून आला. नागरिकांमधील हाच संभ्रम पाहता, अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 24, 2021, 11:30 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY