Breaking News

हवाई मार्गाने ऑक्सिजनची वाहतूक करण्याबाबत केंद्राची महाराष्ट्राला परवानगी , मात्र ..

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 23, 2021 7:41 pm
|

मुंबई – कोरोनाचा अधिक संसर्ग असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक पार पडली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीनंतर विविध मुद्यांबाबत पत्रकारपरिषद घेत माहिती दिली. या बैठकीत हवाई मार्गाने ऑक्सिजनची वाहतूक करण्याबाबत केंद्रानं महाराष्ट्राला परवानगी दिली असल्याचे कळले आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

”या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसमोर संवादपूर्णरित्या आपलं म्हणणं मांडलं आहे. यामध्ये प्रामुख्याने ऑक्सिजनच्या मुद्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, ऑक्सिजनच्या दृष्टीने आम्हाला इतर राज्यांमधून जे ऑक्सिजन मिळेल, ते ऑक्सिजन येण्यासाठी उशीर होतो आहे. त्यामुळे आम्हाला ऑक्सिजन एअर लिफ्टिंग करून मिळेल का? याबाबत अत्यंत सकारात्मक निर्णय निश्चतपणे झाला. की, आपल्याला ज्या काही राज्यांमधून कोटा मिळेल, त्या कोट्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी रिकामे टँकर्स वायू दलाच्या विमानातून नेले जातील आणि येताना ते टँकर्स एकतर रेल्वेने आणले जातील किंवा जवळचं राज्य असेल तर ते टँकर्स रस्ते मार्गाने आणले जातील. केंद्र सरकारच्या या परवानगीमुळे आपल्या राज्याला ऑक्सिजन मिळण्यास निश्चतपणे गती प्राप्त होईल असं मला वाटतं.” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

”फक्त एकच आहे की ऑक्सिजन देताना ते आपली अॅक्टिव्ह केसेसची संख्या सात लाख आहे, यातील काही केसेस गंभीर असतात त्या अनुषंगाने तिथं ऑक्सिजन लागत असतं म्हणून त्या अनुषंगाने ते न्यायीक पद्धतीने मिळावं. ही अपेक्षा अनेक मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्यावर पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, ही बैठक संपल्यानंतर आम्ही ऑक्सिजन बाबत विविध पर्याय काय असू शकतात याबाबतचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन ऑक्सिजनबाबत देण्यात आलेलं आहे.” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 23, 2021, 7:41 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *