Virar Hospital Fire: विरार दुर्घटनेबाबत “त्या” वक्तव्याबाबत राजेश टोपे यांनी दिले स्पष्टीकरण
मुंबई : विरार पश्चिममधील विजय वल्लभ रुग्णालयाती कोविड सेंटरला आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अवघा देश हळहळत असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ही काही नॅशनल न्यूज नाही. राज्य सरकार योग्य ती कारवाई करत आहे. राजेश टोपेंच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली .दरम्यान,याच वक्तव्याबाबत राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच शब्दाचा विपर्यास करू नये, अशी विनंती त्यांनी प्रसार माध्यमांना केली आहे.
“माध्यमांसह राज्यातील जनतादेखील मला पाहत आहे. मी नेहमीच माझ्यावर आलेल्या दु:खांपेक्षा माझी कर्तव्य आणि जबाबदारीला महत्व दिले आहे. मी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही मला आजच पाहात आहात असे नाही, वर्षभरापासून कोविड काळात देखील पाहात आहात. तसेच विरार येथे घडलेल्या घटनेवर सर्वप्रथम प्रतिक्रिया देणारा मीच होतो. ही अत्यंत दुर्देवी घटना असून या घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या परिवारांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत. या परिस्थिती शासनाकडून जी काही मदत करता येईल, ते आम्ही करणार आहोत. या सगळ्या गोष्टींची कडक तपासणी होईल. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा आढळून येईल, तिथे कारवाई होईल. मात्र, शब्दाचा विपर्यास करू नये, एवढीच माझी माध्यमांना विनंती राहील.” असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
या दुर्घटनेत मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत केली जाणार आहे. तर, जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली जाणार आहे. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, वसई-विरार महापालिकेकडूनही मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 23, 2021, 7:22 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY