Breaking News

Virar Hospital fire:विरारमध्ये आगीत 13 कोरोना रूग्णांचा होरपळून मृत्यू, वाचा संपूर्ण यादी

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 23, 2021 3:49 pm
|

वसई पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेत असलेल्या विजय वल्लभ कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. या आगीच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते.. सदर रुग्णालयात एकूण ९० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. आज दि. 23 एप्रिल, रोजी पहाटे 3:13 मिनिटांनी रूग्णालय इमारतीच्या दुसन्या मजल्यावर असलेल्या आयसीयु युनिटमध्ये एसी स्पार्क होऊन ब्लास्ट झाल्यामुळे सदर आयसीयु युनिट मधील यंत्रणा ठप्प होऊन तेथे आग लागली. महानगरपालिका अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. रुग्णालयातील आयसीयु युनिट मध्ये एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते यापैकी १३ रुग्णांना व्हेन्टीलेटर्स व इतर रुग्णांना ऑक्सिजन इ. उपचार यंत्रणा जोडली होती असल्याने ते हालचाल करू शकले नाही .

घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णांमध्ये ५ महिला व ८ पुरुष असून या मध्ये

उमा सुरेश कनगुटकर (६३ वर्षे महिला)

,निलेश भोईर (३५ वर्षे पुरुष)

, पुखराज वल्लभदास वैष्णव (६८ वर्षे पुरुष)

, रजनी आर. कुडू (६० वर्षे महिला)

,नरेंद्र शंकर शिंदे (५८ वर्षे पुरुष)

, जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (६३ वर्षे पुरुष)

कुमार किशोर दोशी (४५ वर्षे पुरुष)

,रमेश टी उपयान (५५ वर्षे पुरुष)

, प्रवीण शिवलाल गोडा (६५ वर्षे पुरुष)

, अमेय राजेश राऊत (२३ वर्षे पुरुष)

, शमा अरुण म्हात्रे (४८ वर्षे महिला)

, सुवर्णा एस.पितळे (६४ वर्षे महिला)

, सुप्रिया देशमुख (४३ वर्षे महिला)

या रुग्णाचा समावेश होता तर इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये तात्काळ हलविण्यात आले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 23, 2021, 3:49 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *