कोरोनाच्या जागृतीसाठी आमदारांच्या पुढाकाराने केली जातेय जागृती..
जव्हार: कोरोनाच्या महामारीत आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आपल्या आमदार निधीतून १२ रुग्णवाहिका मतदारसंघासाठी दिल्यानंतर विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी आता कोरोना विषयी जनजागृती व्हावी, गावांगावात या बाबतची माहिती व्हावी जेणेकरून लोकांमध्ये कोरोना बाबतचे लसीकरणाचे तसेच कोवीड चाचणीचे गैरसमज दुर व्हावेत या साठी स्वखर्चातून प्रत्येक जिल्हा परीषद गटात एक या प्रमाणे १५ वाहने देवून लाउडस्पीकर आणि बॅनर लावलेली वाहने जनजागृती करीत आहेत.
जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड या तालुक्यात ९० टक्क्याहून अधिक भाग हा ग्रामीण आहे. आजही ग्रामीण भागात अनेक आजार अंगावर काढले जातात, तसेच लसीकरण कोवीड चाचणी याबाबतही अनेक गैरसमजातून उपचार वेळेवर होत नसल्याने जिकरीच्या रुग्णात वाढ होवून अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. मुळात लक्षणे कोणती आहेत ती दिसताच क्षणी, चाचणी होणे आणि लागलीच उपचारही होणे गरजेचे आहे, यामुळे रुग्ण दगावत नाही मात्र ग्रामीण भागात थातुर मातुर औषधे किंवा एखाद्या खासगी उपचारावरच अबलंबुन राहिल्याने जीव जाण्यापर्यंत या आजाराची तीव्रता वाढते अशा वेळी उपचार रुग्णवाहिका सक्षम आरोग्य यंत्रणा असण्याबरोबरच खऱ्या अर्थाने जनजागृती व्हायला हवी. या उद्देशातून आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जेंव्हा आपल्याशी संवाद साधतो तेंव्हा खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जनजागृती होते यातून कोरोना वरती बोलीभाषेतील गाणी तसेच स्वतः आमदार भुसारा यांच्या आवाजातील आवाहन असे लाउडस्पीकर लावलेले तसेच घ्यावयाची काळजी कोरोनाची लक्षणे आणि त्यावरील उपचार याबाबतचे बॅनर या वाहनांना लावलेले आहेत. या शिवाय जिल्हा परीषद गटा निहाय हि वाहने फिरत असल्याने याचा चांगलाच उपयोग होत असल्याचे दिसून येते. यामुळे फक्त निवडणूक आणि राजकारणापुरता प्रचार करणाऱ्या राजकीय नेत्यांना चपराक देत भूसारा यांनी स्वखर्चातुन अशी वाहने देवुन जो पर्यंत कोरोना कमी होत नाही गावांगावात जागृती होत नाही तो पर्यंत हि प्रचार वाहने सुरू राहणार आहेत, आमदार सुनील भूसारा यांच्या या कामगिरी बद्दल प्रशासन आणि लोकांमधुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
विक्रमगड विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल भुसारा यांनी प्रतिक्रिया दिली असून म्हटले की ” आपल्या भागात कोरोना बाबत अजूनही खुप गैरसमज आहेत याशिवाय कोरोनाशी साम्य असलेली लक्षणे आढळली तरीही लोक घरीच उपचार करीत असल्याने मृत्यूचे प्रसंग ओढावत आहेत, यामुळे वेळीच निदान आणि वेळेवर उपचार हा सगळ्यात चांगला निर्णय असून याबाबत जनजागृती होण्यासाठी मी ही प्रचार वाहने दिली असून याचा चांगला फायदा होत असून कोवीड निदान होण्याच्या संख्येतही वाढ झाली आहे.माझे पुन्हा एकदा आवाहन आहे कि ताप सर्दी खोकला अंगदुखी चव जाणे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात जावून चाचणी करा आणि औषधे घ्या.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 23, 2021, 3:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY