Breaking News

पुन्हा मृत्यूचे तांडव : विरारमधील कोविड सेंटरला भीषण आग; ICUमधील १५ पैकी १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 23, 2021 1:27 pm
|

विरार : आज पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला. मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिमेतील विजय वल्लभ रुग्णालयातील (Vijay Vallabh COVID care Hospital) अतिदक्षता विभागात भीषण आग लागल्याने . या आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी आयसीयूमध्ये 15 रुग्ण होते. संपूर्ण केंद्रात 90 रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ऑक्सिजनवर असलेल्या 21 रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे 3.25 वाजता ही आगीची घटना घडली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हे कोविड सेंटर दुसर्‍या मजल्यावर आहे. आगीचे कारण एसीमधील शॉर्टसर्किट असल्याचे बोलले जात आहे.

नातेवाईकांचा आरोप – आग लागल्यावर स्टाफ रुग्णांना सोडून पळून आला

रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, ही आग लागली तेव्हा हॉस्पिटलचा स्टाफ रुग्णांना आत सोडून बाहेर पळाला होता. अशा वेळी त्यांनी स्वतः आत जाऊन रुग्णांना काढण्याचा प्रयत्न केला होता. असे बोलले जात आहे की, या घटनेवळी ICU मध्ये दोन नर्स उपस्थित होत्या. तर रुग्णालयाचे CEO दिलीप शाह यांनी दावा केला की, रात्री रुग्णालयात डॉक्टर होते. मात्र त्यांना विचारले की, दुर्घटनेवेळी एकूण किती स्टाफ ड्यूटीवर होता ते योग्य आकडा सांगू शकले नाहीत.

दरम्यान, नाशिकमधील ऑक्सिजन गळतीनंतर 22 जणांना प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच विरारमधील दुर्घटनेने पुन्हा देशभरातील हृदय पिळवटून निघाली आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 23, 2021, 1:27 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *