नाशिक ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत निष्काळजीपणा केल्याचे पोलीस रिपोर्ट्समधून स्पष्ट, अज्ञात व्यक्तिच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
नाशिक :डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत निष्काळजीपणा केल्याचे पोलीस रिपोर्ट्समधून स्पष्ट करण्यात आले आहे. दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) आक्रमक पाऊले उचलली आहेत. ऑक्सिजन गळतीप्रकरणी (Oxigen Leakage) 304ए आयपीएस अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | As per police report, the incident occurred due to negligence. Case registered under section 304A IPC against unknown persons at Bhadrakali police station: Nashik Police Commissioner on the death of 24 people due to oxygen tanker leak at Dr. Zakir Hussain Hospital pic.twitter.com/A7yTqNKoWh
— ANI (@ANI) April 22, 2021
महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती (Oxygen Leakage) होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आणि मनाला वेदना देणारी आहे. या घटनेचा तपास आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी याप्रकरणाचा तपास करणार आहेत. ही घटना घडल्यानंतर ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ गायब होते. पुण्यातील टाय निप्पॉन सो कंपनीला काम देण्यात आले होते.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 22, 2021, 5:39 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY