Breaking News

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठ गाडीवर कुठला Sticker लावू?; मुंबई पोलिसांनी त्याला दिलं भन्नाट उत्तर

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 22, 2021 5:13 pm
|

मुंबई: सध्या बाहेर पडणार्‍या नागरिकांना त्यांच्या गाडीवर अत्यावश्यक सेवेतील कॅटेगरी नुसार 3 विविध रंगांची स्टिकर्स लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत सकाळी 7-11 अशी 4 तासचं किराणा माल, खाद्य पदार्थांची दुकानं खुली असल्याने त्याव्यक्तिरिक्त मेडिकल इमरजन्सी असल्याशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांकडून Color Code पास अत्यावश्यक सेवासुविधांसाठी जाहीर, गैरवापर करणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. स्टिकरच्या रंगांबाबत लोकांमध्ये गोंधळ असल्यानं याबाबतचे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांना विचारलं जात आहेत. त्यातील काही प्रश्न गंमतीशीर सुद्धा आहेत. ट्विटरच्या माध्यमातून असाच एक विचित्र प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकरास पोलिसांनी तितकंच जबरदस्त उत्तर दिलं आहे. पोलिसांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.

दरम्यान,अश्विन विनोद नावाच्या प्रियकराने ट्वीटरवर मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) त्याच्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) भेटण्यासाठी बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्याने ब्रेक द चेन नियमावलीमध्ये पोलिसांना कोणत्या रंगाचे स्टिकर (Color Code Sticker) घेऊ? असा प्रश्न विचारला होता. पण मुंबई पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवरून या तरूणाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ‘तुमच्यासाठी आता हे गरजेचे असेल हे आम्ही समजू शकतो पण सध्या ही गोष्ट अत्यावश्यक या कॅटेगरी मध्ये येत नाही. सध्या ‘अंतर’ चं प्रेम आणि जिव्हाळा वाढवणार आहे आणि तुम्हांला निरोगी ठेवणार आहे.’ मुंबई पोलिसांनी त्यांच्या जोडीला दीर्घकाळ एकत्र राहण्यासाठी शुभेच्छा देत सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याचा सल्ला ट्वीटमध्ये दिला आहे.मुंबई पोलिसांच्या या ट्वीटची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. तणावाच्या आजच्या परिस्थिती पोलिसांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादाचं अनेक मुंबईकरांनी कौतुक केलं आहे.

मुंबईमध्ये काल देण्यात आलेल्या माहितीनुसर, कोरोना विषाणूच्या 7684 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 6,01,590 वर गेली आहे. शहरात 6790 रुग्ण बरे झाले असून, 62 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या मुंबईमध्ये 84,743 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 22, 2021, 5:13 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *