… अन्यथा राज्यावर मोठे संकट येऊ शकते : नवाब मलिक
मुंबई – देशभरातील अनेक राज्यातून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.रुग्णांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय. दरम्यान राज्यात ऑक्सिजन त्याचबरोबर रेमडेसिविर औषधाचा तुटवडा राज्य सरकारच्या चिंतेत भर टाकत आहे. यादरम्यान राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्राला यामध्ये दररोज २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी जाहीर केली आहे.
याबाबत ट्विट करत नवाब मलिक यांनी राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर दिले जावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यावर मोठे संकट येऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी पुढे म्हटले आहे की, नुकतेच राज्यांना होणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन वाटपासंबंधी माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार आधीपासून मागणी करत असल्याप्रमाणे दिवसाला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे.
आम्हाला आतापर्यंत दररोज ३६ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. नव्या वाटपानुसार, महाराष्ट्राला दररोज २६ हजार इंजेक्शन्स मिळणार असल्यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यावर मोठे संकट येऊ शकते, अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. आम्हाला केंद्र सरकारने दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देऊन राज्यातील नागरिकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, अशी मागणीही त्यांनी पुढे केली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 22, 2021, 4:29 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY