“जिसका राजा व्यापारी, उसकी जनता भिखारी.”:काँग्रेसने ट्विट केला नितीन गडकरींच्या भाषणाचा व्हीडिओ
मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असतानाच राज्यात ऑक्सिजन त्याचबरोबर रेमडेसिविर औषधाचा तुटवडा राज्य सरकारच्या चिंतेत भर टाकत आहे. यादरम्यान राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. महाराष्ट्राला यामध्ये दररोज २६ हजार रेमडेसिविर देण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची म्हणाले होते “जिसका राजा व्यापारी, उसकी जनता भिखारी.”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची म्हणाले होते "जिसका राजा व्यापारी, उसकी जनता भिखारी." कोरोनामुळे रोज हजारो रूग्ण मरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याऐवजी कोरोन लसीचा व्यापार करत आहेत.@nitin_gadkari@RahulGandhi@narendramodi@INCIndia pic.twitter.com/DfjUlVW7K7
— Nana Patole (@NANA_PATOLE) April 22, 2021
यावरुन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी ट्विट करत म्हटले आहे की , कोरोनामुळे रोज हजारो रूग्ण मरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याऐवजी कोरोन लसीचा व्यापार करत आहेत असा खोचक टोला लगावत त्यांनी हा व्हिडिओ नितीन गडकरी ,राहुल गांधी ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केला आहे.
दरम्यान, एक मेपासून १८ वर्षांवरील सर्व लोकांसाठी लसीकरण खुले होण्याआधी केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कोविशील्ड लसीचे दर जारी केले. यावरून नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सीरम कंपनी राज्य सरकारांना ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोसच्या दराने लसपुरवठा करेल. कंपनीच्या या घोषणेनंतर दरांवरून वादंग उठले आहे. सीरम सध्या केंद्राला १५० रुपये प्रतिडोसच्या दराने लस देत असून करारानुसार जुलैपर्यंत याच दराने देणार आहे. राज्य सरकारांसाठी महागड्या दरांमुळे कॉंग्रेस ने केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 22, 2021, 3:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY