Breaking News

ग्रामीण भागात कोविड लसीकरण धिम्यागतीने सुरू तर नागरीकांच्या मनात लसीविषयी गैरसमज व संभ्रम

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 21, 2021 5:14 pm
जव्हार | मनोज कामडी

जव्हार :सध्या दिवसेंदिवस महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर उपचार होण्याची लस तयार करण्यात आली आहे. देशातील कोविशिल्ड व कोवाक्सिन या दोन प्रकारच्या लस उपलब्ध असून सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व कोरोना योद्धा यांना लस देण्यात आली या नंतर वय वर्ष ६० वयोवृद्ध व्यक्तींना लसीकरण करण्यात आले, सध्या ४५ वर्षावरील व ज्यांना मधुमेह व रक्तदाब असलेल्या व्यक्तींना लसीकरण सुरू असून पालघर जिल्ह्यात ऑनलाईन पोर्टलवर असलेल्या आकडेवारी नुसार १,८१,३४५ एवढ्या लोकांचे लसीकरण झाले.आकडेवारी नुसार भारतात आतापर्यंत सर्वत्र लसीकरण सुरू असून लस घेतल्यानंतर कोणताही व्यक्तीला लसीकरण चा दुष्परिणाम झालेला नाही, कोरोना मुक्त करण्यासाठी लसीकरण करणे हाच पर्याय उपलब्ध आहे व या दोन्ही लस सुरक्षित आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर नॉर्मल ताप किंवा अंगदुखी होत असते,परंतु तरी सुद्धा कोविडं लसीकरण विषयी ग्रामीण भागात लोकांमध्ये विविध प्रकारचे गैरसमज पसरल्याने नागरिक लस टोचून घेण्यासाठी घाबलेल्या अवस्थेत आहे, अशी परिस्थिती सध्या ग्रामीण भागात दिसत असून याबाबत आपले कुटूंब आपली जबाबदारी, माझे गाव माझी जबाबदारी या नुसार आरोग्य विभागाच्या वतीने गावातील आशा वर्कर,अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांच्या मदतीने लसीकरण विषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे .लसीकरण चे महत्व पटवून देण्याची आवश्यकता असून सध्यास्थितीत जव्हार तालुक्याती दररोज नव्याने १०० ते २०० रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आजपर्यत १२२३ रुग्ण उपचार घेत आहेत.तसेच गावागावात तापाची साथ पसरली असून अनेक व्यक्तींना ताप, सर्दी खोकला, अंगदुखी, या सारखी लक्षणे दिसत असूनही लोक घरी बसून राहत आहेत. या मुळे ग्रामीण आदिवासी भागात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, गावातील महिला बचत गट, युवक मंडळे यांनी पुढाकार घेऊन जर प्रशासनला सहकार्य केले तर लवकरच हे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ शकते. तसेच १ मे पासून केंद्रसरकार मार्फत घोषणा करण्यात आली की १८ वर्ष वरील सर्वच व्यक्तींना लसीकरण दिले जाणार असून सदर मोहीम राबवणार असल्याने ग्रामीण भागातील लोकांनी स्वतःहुन पुढाकार घेऊन सहकार्य केल्यास कोरोना रुग्णांची संख्या निश्चितच कमी होऊ शकते, पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागातील महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, पालघर उमेद अभियान मार्फत प्रभागसंघ,ग्रामसंघ, व महिला स्वयंसहायता गटातील सहभागी महिलांना गावपातळीवर समुदाय प्रशिक्षक ऑनलाईन मोबाईल च्या माध्यमातून कोविडं १९ संबंधी योग्य वर्तवणूक व लसीकरणाविषयी जाणीव जागृती कार्यक्रम सुरू असून महिलांना गावपातळीवर लसीकरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. तरी जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांना कोविडं लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावे, या मुळे ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल.

याबाबत जिल्हा परिषद शाळा दादरकोपरा येथील श्री.रामचंद्र मोकाशी (मुख्याध्यापक) यांनी म्हटले , मी स्वतः लसीकरण केले असून लस घेतल्यानंतर अंगदुखी व ताप सौम्य लक्षण १/२ दिवस जाणवली.परंतु मला कोणता ही त्रास झाला नसून ही लस सुरक्षित असून सर्वांनी आपलं ओळखपत्र,आधार कार्ड घेऊन जावे व जवळच्या लसीकरण केंद्रात लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करत आहे

दरम्यान, त्यामध्ये पहिला डोस १,५५,०९८ एवढ्या व्यक्तींनी तर दुसरा डोस २६२४७ व्यक्तींनी पूर्ण केला.पालघर जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी तालुक्यातील आतापर्यंत तीन ठिकाणी लसीकरण केंद्र असून सुद्धा आतापर्यत ३४२५ एवढ्या व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झाले. तर पतंगशहा कुटीर रुग्णालय, जव्हार येथे आतापर्यंत २९६६ तर प्राथमिक आरोग्य केंद्र जामसर येथे १९८ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत येथे २६१ इतक्या लोकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केले आहे. या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या टप्प्यात ५०० लस पुरवण्यात आल्या होत्या. आकडेवारी नुसार ग्रामीण भागात सध्या लसीकरण केंद सुरू असून अगदी संथ गतीने होताना दिसत आहे. कारण आताच्या परिस्थितीत जव्हार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जामसर येथील ५ कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत येथील १३ कर्मचारी हे कोरोना बाधित असल्याने तिथे अपुऱ्या कर्मचाऱ्या मुळे लसीकरण केंद्र बंद असल्याची स्थिती आहे. तसेच कोरोना रुग्णांची संख्या व इतर आजाराची लक्षणे असलेलेची गर्दी मोठ्या प्रमाणात तपासणीसाठी येत असल्याने कर्मचारी अपुरे पडत आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 21, 2021, 5:14 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *