Breaking News

मोठी बातमी: राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 20, 2021 7:49 pm
|

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आता लॉकडाऊन लागणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. तसेच, राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. राज्यात कडक निर्बंध लागू आहेत, मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नाही. ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, बेड मिळत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येत्या काही तासांत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन आणावा लागेल.सध्याची परिस्थिती पाहाता १५ दिवस लॉकडाऊन लावावा अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे आणि त्यानुसार सरकार आता १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा करु शकते.

आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही- राजेश टोपे

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. लॉकडाऊन शिवाय पर्याय उरला नाही. उद्या रात्रीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत घोषणा करतील.

कडक लॉकडाऊन हवा-एकनाथ शिंदे

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘राज्यात लॉकडाऊन लावला, तर तो अत्यंत कडक असला पाहिजे. राज्यात कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर फिरत आहेत. कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कडक लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील आणि उद्यापासून हा निर्णय लागू करतील’, असे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्या आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची परिस्थिती चिंता करणारी आहे. त्यामुळे राज्यात 144 कलम लागू करत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या संचारबंदीचे नियमही अनेकांकडून पाळले जात असल्याने लॉकडाऊनचा विचार पुढे येत आहेत. दरम्यान, राज्यात पश्चिम महाराष्ट्रात भयावह परिस्थिती दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर दिसून येत आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 20, 2021, 7:49 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *