Breaking News

अंध महिलेच्या मदतीला धावला देवदूत मयुर शेळके, जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावरून चिमुकल्याला वाचवलं

रेल्वे पॉईंटमन मयुरचं सर्व स्तरातून कौतुक

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 19, 2021 6:28 pm
|

वांगणी : रेल्वेच्या पॉइंटमने (Railway Pointsman) चिमुकल्‍याचे प्राण वाचवण्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाला आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) वांगणी( Vangani Railway Station)स्थानकावरील ही घटना आहे. शनिवारी एक अंध महिलेल्या हातून सुटलेल्या तिच्या बाळाचे प्राण देवदूतासारखा धावून आलेल्या रेल्वे पॉईंटमनमुळे वाचले. वांगणी रेल्वे स्थानकावरील फलाटावरुन अंध महिला आपल्या मुलाचा हात धरुन चालत होती. अचानक तिच्या उजव्या बाजुला असलेल्या ट्रॅकवर तिचा लहान मुलगा जाऊ लागला. आणि काही कळण्याच्या आत तिचा लहान मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक सेंकदाचाही वेळ झाला असता तर चिमुल्यासह पॉईंटमनलाही जीव गमवावा लागला असता. मात्र जीव धोक्यात घालून पाईंटमन रेल्वे रुळावर धावत आला आणि चिमुकल्याला जीवदान मिळालं. पॉईंटमन मयूर शेळकेच्या प्रसंगावधानामुळे चिमुकल्याचा जीव वाचला.

वेळेस 5 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास उद्यान एक्सप्रेस (Udyan Express) रेल्वे स्थानकावर येत होती. घाबरलेली अंध महिला आपल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. मात्र तिला फलाटाचा अंदाज येत नसल्याने ती चाचपडत होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चित्रीत झालंय.

त्याच वेळेस ड्युटीवर असलेला पॉइंट मयूर शेळके हा ट्रॅकमधून तिथे धावत आला आणि त्याने क्षणार्धात त्या मुलाला फलाटावर उचलून स्वतःही फलाटावर गेला. अक्षरशः काही सेकंदाच्या मयूर शेळके यांच्या सतर्कतेमुळे या मुलाचे प्राण वाचले. या धाडसी कार्याबद्दल शेळके यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मध्य रेल्वेकडून सुद्धा शेळके यांना मुख्यालयात बोलवून टाळ्या वाजून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनीसुद्धा त्यांचे कौतुक केले.

 


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 19, 2021, 6:28 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *