Breaking News

राज्यात आजची रुग्णवाढ चिंताजनकच; गेल्या 24 तासात 68 हजार पेक्षा अधिक नवे रुग्ण, 500 हून अधिक जणांचा मृत्यू

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 18, 2021 9:14 pm
|

मुंबई: देशात कोरोना महामारीमुळे परिस्थितीही नियंत्रणाबाहेर गेली आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाला विळखा घातला असून प्रत्येक राज्य आणि शहरांत पहिल्या तुलनेत खूप जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ६७ हजार १२३ इतकी होती. कालच्या तुलनेत आज काहीशी वाढ झाली असून हा फरक १ हजार ५०८ इतका आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४५ हजार ६५४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ५६ हजार ७८३ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३८८ वर जाऊन पोहचली आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. मुंबई आज 8 हजार 479 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 53 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात ६,७०,३८८ सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३८८ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख २२ हजार ४८६ इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या ८६ हजार ७३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा ८६ हजार ६८८ इतका आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७३ हजार ४८५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४२ हजार ५६३ इतकी आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 18, 2021, 9:14 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *