भाजपाचे जेष्ठ नेते माजी सभापती कै.जानू कोरडा यांचे निधन

जव्हार : तालुक्यातील मौजे न्याहाळे बुद्रूक मधील नांगरमोडा गावचे आधारस्तंभ ,भाजपाचे जेष्ठ नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक, पंचायत समिती जव्हारचे माजी सभापती कै. जानू धाकल कोरडा यांचे शनिवार दिनांक १७ एप्रिल२०२१रोजी पहाटे ५:०० वाजता दुःखद निधन झाले.
नांगरमोडा गावाच्या व न्याहाळे ग्रामपंचायतीच्या इतरही पाड्यांच्या जडणघडणीत कै. जानू धाकल कोरडा यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक , आर्थिक व आध्यात्मिक क्षेत्रात बहुमोल असे कार्य करून नांगरमोडा गाव आदर्श करण्यासाठी अहोरात्र झटले .
स्पष्टवक्ता, सडेतोडबाणा , निर्मळपणा, सत्यवादी आणि माणुसकी ह्या तत्त्वानुसार त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले.जानू कोरडा च्या असे अचानक जाण्याने कोरडा कुटुंब व नांगरमोडा गावाचे नुकसान तर झाले आहेच यासोबतच राजकीय व सामाजिक क्षेत्रांची सुद्धा हानी झालेली आहे.त्यांचे आदर्श घेऊन नांगरमोडा व पंचक्रोशीतील समाज नक्की चांगले कार्य करेल व त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करतील.त्यांना आज जव्हार पंचक्रोशीतुन सर्वच नागरीकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 18, 2021, 1:31 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY