“उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारण थांबवून जबाबदारी घेतली पाहिजे: , केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुख्यमंत्र्यांवर टीका!
मुंबई : ”राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. . गेल्या काही दिवसांपासून लस तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर थेट केंद्रातून मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी”, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे.
Saddened to see @OfficeOfUT’s gimmicks on oxygen. GoI, with all stakeholders, is ensuring maximum oxygen production in India. We are currently producing 110% of Oxygen generating capacity and diverting all available Oxygen from industrial use to medical use.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021
गोयल म्हणाले की, देशात आतापर्यंत महाराष्ट्राला सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळाला आहे .“आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे”, असं गोयल म्हणाले आहेत. या संकटाच्या या घडीमध्ये केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम केले पाहिजे. ते म्हणाले, ‘या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून राजकारण केल्यामुळे मी दु: खी आणि आश्चर्यचकित झालो आहे. त्यांनी हे निर्लज्ज राजकारण थांबवलं पाहिजे आणि जबाबदारी घेतली पाहिजे”, असं देखील गोयल यांनी म्हटलं आहे.
Saddened to see @OfficeOfUT’s gimmicks on oxygen. GoI, with all stakeholders, is ensuring maximum oxygen production in India. We are currently producing 110% of Oxygen generating capacity and diverting all available Oxygen from industrial use to medical use.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021
‘महाराष्ट्रत सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या लोकांसाठी योग्य ते काम करत आहे. महाराष्ट्रातले नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारीचं योग्य पद्धतीने पालन करत आहेत. पण आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्य पाळून माझं राज्य, माझी जबाबदारी हे तत्व पाळण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पियुष गोयल यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
Maharashtra has so far received the highest quantity of Oxygen in India.
Centre is in daily touch with State Governments to assess their needs & help them in best possible manner.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021
Just yesterday, PM in his review told that centre & states should work with synergy in this crisis.
With this background, shocked and saddened to see petty politics being played by @OfficeOfUT. He needs to stop his daily dose of shameless politics and take responsibility.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 17, 2021, 8:11 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY