पंढरपूर विधानसभा पोट निवडणूक चुरशीची , भाजपकडूनही होत आहेत विजयाचे दावे
पंढरपूर मंगळवेढा: आज सकाळी सात वाजेपासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिलेले भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, शनिवारी मतदान होत आहे. या जागेवर भाजपने समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीने भगीरथ भालकेंना निवडणुकींच्या रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.सध्या दोन्हीही पक्ष आपापल्या उमेदवाराच्या विजयाचे दावे करत आहेत.
या मतदारसंघात एकूण 524 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. या मतदार संघामध्ये एकूण 3.40 लाख मतदार आहे. मतदार संघात आतापर्यंत 65 हजार 891 मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी 19.33% आहे. यामध्ये पुरुषांचे मतदान 38,587 तर स्त्रियांचे मतदान 27,304 आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे पूर्ण ताकदीने प्रचार केला. प्रदेशाध्यक्ष भाजप अध्यक्ष पाटील म्हणतात की, येथील लोकांनी भाजप उमेदवाराचा विजय निश्चित केला आहे.तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सलग येथे लक्ष ठेवून होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचारसभेला प्रचंड गर्दी झाली होती. यात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला.
दरम्यान ,राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 17, 2021, 1:39 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY