Breaking News

CBSC नंतर आता ICSE बोर्ड परीक्षांबाबतही मोठी बातमी

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 16, 2021 7:55 pm
|

नवी दिल्ली, :सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. काही दिवसांपासून कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या दुसऱ्या लाटेतील चिंतेची बाब म्हणजे, यात लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका जाणवत आहे. सध्या जगभर लसीकरण सुरू आहे, दरम्यान , CBSC नंतर आता ICSE बोर्ड परीक्षांबाबतही मोठी बातमी समोर आली आहे. CISCE नेसुद्धा बाराबी आणि दबावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा कधी होतील याबाबत आता माहिती देण्यात आली नाही आहे. जूनमध्ये याबाबत अंतिम निर्णय होईल.

CISCE च्या प्रमुखांनी सांगितलं होतं, CISCE च्या दहावी आणि बाराबीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल आणि त्याबाबत लवकरात लवकर निर्णय दिला जाईल.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे केवळ सीबीएसईच्याच नाही तर देशभरातील एकूण सात राज्यातील शिक्षण मंडळांनी आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra), मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

CBSC नंतर ICSE च्या परीक्षांबाबत काय निर्णय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्र्यांमध्ये बैठक झाल्यानंतर CBSC ची बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. यानंतर आता CISCE परीक्षांबाबतही निर्णय झाला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 16, 2021, 7:55 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *