.. तरच संकट आपण टाळू शकतो, राजेश टोपे यांनी जनतेला केले आवाहन
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडाही जाणवत आहे. दरम्यान , राज्य सरकारने मोठी तडजोड करून लोकांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन केलं आहे. अनेकांना या निर्णयाचा त्रास होत आहे याची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही परिस्थितीत हा लॉकडाऊन यशस्वी करावा, अशी विनंती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी जनतेला केली आहे.
#BreakTheChain हे अभियान यशस्वी ठरेल, कोरोना नियंत्रणात येईल, हे आपण दाखवून देऊ. निर्बंध पाळले जावेत, कुठेही गर्दी होऊ नये यासाठी जनतेने ‘ट्रिपल टी’ म्हणजे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट ही त्रिसूत्री पाळणे फार महत्त्वाचे आहे. कोणीही लक्षणं दिसल्यास टेस्टिंग करणं टाळू नये. जनतेने जागरूक होणे गरजेचे आहे. यातूनच हे संकट आपण टाळू शकतो, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
लॉकडाऊन पर्याय महत्त्वाचा यासाठी आहे की घरात राहिल्याने लोक कोरोना संक्रमण व संसर्ग होण्यापासून वाचू शकतात. परस्पर संपर्क टाळल्यास प्रादुर्भावाचा धोका कमी होऊ शकतो, म्हणून संक्रमण टाळण्यासाठी सगळ्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून घरी राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. तसेच केंद्र सरकारने राज्यातून पाठविलेल्या सर्व स्वॅब अहवालाबाबत, डबल म्युटेशन आहे का याबाबतची स्पष्टता नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) संस्थेने देणे गरजेचे आहे. त्यासोबतच यासाठी लागणारी यंत्रणा, उपचार याबाबत मार्गदर्शनदेखील केंद्राने करावे, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
राज्यात कोरोना टेस्टिंग व निदान होण्यासाठी लागणारा वेळ हा २४ तासांहून अधिक असू नये हाच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी टेस्टिंग यंत्रणा कुठल्याही कारणास्तव थांबता कामा नये, तसेच खासगी आरोग्य यंत्रणेचाही यात समावेश करून घ्यावा, अशा सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. टेस्टिंग वाढविण्यासाठी नवीन यंत्रणा आणली असून त्याद्वारे १० हजार टेस्टिंग एकावेळी होऊ शकतील. ही यंत्रणा राज्यात हॉटस्पॉट असलेल्या जागी बसवता येऊ शकेल. यानिमित्ताने राज्य सरकार पूर्ण भर टेस्टिंग वर देत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने हलगर्जीपणा न करता, कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित टेस्टिंग करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना संपूर्ण आरोग्य विभाग सुरुवातीपासूनच अगदी धैर्याने, हतबल न होता काम करत आहे. अशाच सकारात्मक भूमिकेतून, खचून न जाता, मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचार्यांना केले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 7:28 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY