उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना, बारामती तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावचा घेतला आढावा
बारामती शहर आणि तालुक्यात करोनाप्रतिबंधक उपाययोजनांची अमलबजावणी युद्धपातळीवर करा. करोनारुग्णांचे वाढते प्रमाण गंभीर असून या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कुचराई चालणार नाही. त्यामुळे हा विषय सर्वांनी गांभीर्याने घ्यावा. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक घेतली. बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी युद्धपातळीवर करा,असं सूचित केलं.शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्यानं कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू, असा विश्वास आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनानं कठोर निर्बंध लावले आहेत. नागरिकांकडून त्या निर्बंधांचं पालन केलं जाईल, यासाठी दक्ष राहून काम करा. सार्वजनिक ठिकाणी तसंच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे, अशा सूचना केल्या.लसीकरणाचा वेग वाढवावा. वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसंच निधीची कमरतरता पडू दिली जाणार नाही, असं स्पष्ट सांगितलं. सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावं व प्रशासनास सहकार्य करावं, ऑक्सिजनबाबतही सर्व रूग्णालयांनी काळजीपूर्वक त्याचा वापर करावा, अशा सूचना केल्या.गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी रूग्णालयामध्ये गरजेनुसार रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या. त्यामुळे गरज नसताना रेमडेसिविर, ऑक्सिजनसाठी रूग्ण व नातेवाईकांची कोंडी करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर आता तपासणी पथकाची करडी नजर राहणार आहे, असे अजित पवार याांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 7:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY