मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार, म्हणाले – असेच सहकार्य राहिले तर एकत्रितपणे संकटावर सहज मात करू
मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन वाढावे यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लसींच्या उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली होती, जी त्यांनी मान्य केल्याचे ट्विट मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. आपण विनंतीला मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू, अशी आशाही राज यांनी व्यक्त केली आहे.
१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की. @PMOIndia
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2021
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरूवारी परवानगी बाबत एक पत्र पाठवले आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, हाफकीनला लस उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण पंतप्रधानांकडे केली होती, ज्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राज ठाकरे यांनीही म्हटले आहे.
भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लस बनवण्यास केंद्र सरकारने राज्याच्या हाफकिन संस्थेस मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने ही लस बनवण्यास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व निर्धारित एक वर्षाच्या आत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
दरम्यान, ‘कोव्हॅक्सिन बनवण्यास 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी 154 कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरू करण्याचे नियोजन केले आहे. हाफकिनमार्फत एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यंत अंदाजे 12 कोटी 60 लाख लसी निर्माण करण्याची क्षमता आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 2:56 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY