Breaking News

CCTV VIDEO:औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू ? सीसीटीव्हीमुळे आला ट्विस्ट

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 15, 2021 7:57 pm
|

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 15 दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. याशिवाय आधीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकानं उघडण्यास मुभा आहे. मात्र या नियमांच्या विरुद्ध जाऊन औरंगाबादेतील सलून व्यावसायिक फिरोज खान यांनी सलून उघडलं.

दरम्यान , संभाजीनगर मध्ये पोलिसांच्या मारहाणीत एका सलून चालकाचा मृत्यू झाल्याची बातमी काल वाऱ्यासारखी पसरली. सलून उघडल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी सलूनवर पोहोचले. पोलिसांनी खान यांना बेदम मारहाण केल्याचा दावा केला जात होता. या मारहाणीत सलून व्यावसायिक फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. फिरोज यांचा मृतदेह उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठेवून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर खान यांचा मृतदेह विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर वातावरण निवळले..

दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलीस बोलत असताना सलून चालक अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात हलवल्याचंही फूटेजमध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी सलून चालकाला मारहाण केली की नाही, असा संभ्रम आता निर्माण होत आहे. या प्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली केली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 15, 2021, 7:57 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *