महाविकास आघाडीचे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा,हे कोण्या येड्या गबाळ्याचं काम नाही
पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
अशातच दोन दिवसांपूर्वा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत बोलताना तुम्ही भाजपचा (BJP) एक उमेदवार निवडून द्या, मी सरकार बदलवून दाखवतो, असा सूचक इशारा महाविकास आघाडीला दिला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. राजकारणात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? फडणवीसांनी पावसात घेतलेल्या सभेची खिल्ली उडवताना ते म्हणाले की, तुम्ही कुठे अन् साहेब कुठे असं सांगत, साहेबांनी साकार केलेले सरकार पाडणारा अदयाप जन्माला यायचा आहे, हे कोण्या येड्या गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.
मागील पाच वर्षांत भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रावर मोठा अन्याय झाला. या भागातील अनेक योजनांना जाणीवपूर्वक निधी देण्यापासून रोखण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचना योजनेला देखील निधी देण्यात आला नाही. आता पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही निधी देऊ असं सांगत आहेत. मग, मागील पाच वर्षांत निधी देण्यासाठी तुमचा कोणी हात धरला होता का, असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 15, 2021, 2:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY