‘बेड द्या किंवा त्यांना इंजेक्शन देऊन जिवे तरी मारा’, मुलाचा हृदय पिळवटून टाकणारा टाहो

चंद्रपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाच्या अनेक राज्यांमध्ये परिस्थिती एवढी भयंकर झाली आहे की, कोरोनावर नियंत्रणासाठी राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्मशानभूमी आणि कब्रिस्तानमध्येही जागा कमी पडत आहे. रुग्णालयांमध्ये बेड रिकामे नाही, ऑक्सीजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आहे. ऑक्सीजनच्या कमतरता आणि योग्य उपचार मिळू न शकल्याने अनेक राज्यांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे. ऑक्सिजन सिलेंडरसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना सगळीकडे फिरावे लागत आहे. अशीच एक घटना चंद्रपुरातून समोर आली आहे. कोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या आपल्या वडिलांना बेड मिळावा यासाठी मुलाने रुग्णालयात टाहो फोडलाय. वडिलांना एकतर बेड द्या किंवा त्यांना सरळ इंजेक्शन देऊन जिवे तरी मारा, असे हा तरुण म्हणतोय. या दृश्यामुळे अनेकांच्या काळजाचं पाणी – पाणी झालं.
24 घंटे चक्कर लगाए, कहीं बेड नहीं!
बुज़ुर्ग मरीज़ के बेटे की गुहार, ‘या बेड दो या इंजेक्शन देकर मार दो!’
महाराष्ट्र के चंद्रपुर का हाल. pic.twitter.com/ZzxhlnzdZL
— Puja Bhardwaj (@Pbndtv) April 14, 2021
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चंद्रपुरातील रहिवासी सागर किशोर नहारशेटीवार यांचे वडील गंभीर आजारी आहेत. अशा परिस्थितीत मुलाने त्यांच्या उपचारासाठी महाराष्ट्र तसेच तेलंगणातील अनेक रुग्णालयांना भेट दिली, पण त्यांना उपचारांसाठी बेड मिळू शकला नाहीत. उपचारांसाठी सागरही वडिलांसह मुंबईहून थेट 850 कि.मी. अंतरावरील चंद्रपूरला पोहोचला, पण येथील रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे तेथील आरोग्य सुविधांवरही तीव्र परिणाम झाला, ज्यामुळे रुग्णालये 24 तास बंद राहिली.
माध्यमांशी बोलताना सागर म्हणाला , मी दुपारी तीन वाजेपासून चकरा मारतोय. सर्वात आधी चंद्रपुरातील वरोरा रुग्णालयात गेलो, पण तेथे बेड नव्हता. यानंतर अनेक खासगी रुग्णालयांमध्ये गेलो, तेथेही जागा नव्हती. रात्री दीड वाजता आम्ही तेलंगणाकडे निघालो. तेथे तीन वाजता पोहोचलो. पण तेथेही उपचार मिळू शकले नाहीत. यामुळे सकाळी महाराष्ट्रात पुन्हा परत आलो. सध्या माझे वडील रुग्णवाहिकेत आहेत. आपल्या वडिलांना रुग्णवाहिकेत त्रास होताना पाहून सागर खूप दुःखी झाला. त्यांने सांगितले की, रुग्णवाहिकेत बरेच तास घालविल्यानंतर आता माझ्या वडिलांचा ऑक्सिजन संपू लागला आहे. यानंतर सागरने एक अतिशय हृदयस्पर्शी विनंती केली. तो म्हणाला माझ्या वडिलांना बेड द्या किंवा इंजेक्शन देऊन ठार करा. मी या स्थितीत त्यांना घरी नेऊ शकत नाही.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 15, 2021, 2:19 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY