मोठी अपडेट! आता वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या परीक्षा “या” महिन्यात होणार , वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना संसर्गांला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची वेद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी माहिती दिली आहे . या परीक्षा आता जूनमध्ये घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 10 वी 12 वीसह अनेक परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 15, 2021, 1:46 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY