मनसेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे निधन
नांदेड : मनसेचे नांदेड जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हैद्राबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रदीर्घ काळ कौडगे यांनी शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख पद भूषवले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. (MNS Nanded District Chief Prakash Kaudage Dies in Hyderabad) पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर नांदेड जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसंच त्यांच्याकडे नायगांव, भोकर आणि हदगांव या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारीही होती. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर मनसे आणि इतर मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
कौडगे शिवसेनेचे प्रदीर्घ काळ जिल्हाप्रमुख होते. तसंच त्यांचा सामाजिक आणि राजकीय स्तरावर चांगला दबदबा होता. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या प्रकाश कौडगे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. याचा फटका शिवसेनला बसला. अखेर डिसेंबरमध्ये त्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला.नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कौडगे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यांच्या मनसेप्रवेशामुळे नांदेडमध्ये मनसेची ताकद आणखीनच वाढली होती. नायगांव, भोकर आणि हदगांव या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.. नांदेड जिल्ह्यातील समस्यांसाठी कौडगे यांनी एकेकाळी अनेक आंदोलने केली होती. लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला. तसंच तरुणांचं संघटन करण्यातही त्यांचा हातखंड होता.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 15, 2021, 1:13 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY