Breaking News

भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोना विषाणूची लागण

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 15, 2021 12:15 pm
|

मुंबई :कोरोनाचा संसर्गाने देशात हाहाकार उडवण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. जगाच्या तुलनेत दररोज सर्वांधिक रुग्णांची नोंद भारतात होत आहे. गेल्या एक-दोन महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा (Corona Virus) प्रकोप वाढत चालला आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची (Corona Positive) लागण झाल्याचे समोर आले आहे. आता भाजप (BJP) नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

भाजप नेते आशिष शेलार यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. “मी आज कोविड-१९ ची तपासणी केल्यास माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेत, त्या सर्वांनी स्वत:ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले.

दरम्यान वाढत्या कोरोना पाश्ववभूमीवर महाराष्ट्रात बुधवारी रात्री 8 वाजेपासून महाराष्ट्रात मिशन ‘ब्रेक द चेन’ सुरू झाली आहे, ज्यावरुन राज्यभरात CrPC च्या कलम 144 अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत. म्हणजेच, आज नंतर 5 किंवा त्याहून अधिक लोक एका ठिकाणी एकत्र जमणार नाहीत. हा नियम 1 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत चालू राहील. तर बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 58,952 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले. तर 278 जणांचा मृत्यू झाला. वेगाने होणारी वाढ आणि चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण राज्यात 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांची राज्यव्यापी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 35,78,160 पर्यंत वाढली आहे, तर आतापर्यंत एकूण 58,952 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 15, 2021, 12:15 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *