Breaking News

गुजरातमधील परिस्थिती गंभीर , कोरोना रोखण्यासाठी चक्क यज्ञ

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 14, 2021 8:14 pm
|

गुजरात: गुजरातसह देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात 24 तासात 1,84,372 नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे गुजरातमध्ये रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून आपत्कालीन सेवेत येणार्‍या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यामुळे गुजरातमध्ये नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी सरकारी रुग्णालय आणि स्मशानभूमीत यज्ञ करण्यात आला.

गुजरातच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये आर्य समाजाद्वारे यज्ञाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, यज्ञ करण्यास रुग्णालय प्रशासनानेच सांगितल्याचं आर्य समाजाच्या सदस्यांनी सांगितले आहे. आर्य समाजाच्या सदस्यांनी स्मशानभूमीत जाऊनही यज्ञ केला होता. रामनाथ घेला आणि कुरुक्षेत्र स्मशानभूमीत हा यज्ञ केला, असे आर्य समाजचे अध्यक्ष उमाशंकर आर्य यांनी वृत्तपत्राला सांगितले.

दरम्यान , मागच्या आठवड्यापासून शहरातील स्मशाभूमींमध्ये दिवसरात्र मृतदेह जळत आहेत. शहरातील अश्विनीकुमार, रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमध्ये मोठी रांग पाहायला मिळत आहे. जवळपास 16 विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या अविरत सुरू असल्याने त्यांच्यात बिघाड व्हायला सुरुवात झाली आहे. स्मशानभूमीत सध्या दिवसाकाठी 80 मृतदेह येत असल्याने सर्व विद्युतदाहिन्या अखंड सुरू आहे. सतत सुरू असल्याने विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्या आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 14, 2021, 8:14 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *