कोरोनाचे भयावह चित्र, “याठिकाणी” शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा
गुजरात: अहमदाबादमधील शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती आहे. येथे रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. गेल्या 10 दिवसांपासून आपत्कालीन सेवेत येणार्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यातील बहुतेक कोविड-19 चे रुग्ण आहेत. यामुळे अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी 60 रुग्णवाहिका वाढविण्यात आल्या आहेत.
गुजरातमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी पुरेसे असल्याचे सांगितले आहेत. ते म्हणाले की, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्य सरकारकडून कोणतीही चूक झाली नाही. आम्ही गेल्या एक वर्षापासून कोरोनाविरुद्ध सातत्याने लढा देत आहोत. मंगळवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सीएम विजय रूपाणी म्हणाले की, गुजरातमध्ये सर्वाधिक 70 टक्के रुग्ण अहमदाबाद, सुरत, राजकोटसह चार महानगरांतून समोर येत आहेत.
ते म्हणाले की, सोमवारी गुजरातमध्ये सहा हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. परंतु संसर्गाची शृंखला खंडित करण्यासाठी आम्ही वैद्यकीय सुविधा वाढविली आहे. आगामी काळात गुजरातमधील कोरोनाचा संसर्ग कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
https://twitter.com/ANI/status/1382258684055621633
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 14, 2021, 7:57 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY