मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची PM Modi यांना पत्र, केल्या “या” महत्त्वपूर्ण मागण्या
मुंबई – महाराष्ट्रात वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता आता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. अशामुळे कोरोना वायरस पासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण हा एक एकच पर्याय आहे. आणि त्याचा वेग आता वाढवण्यासाठी महाराष्ट्राकडून मागणी होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केंद्रासोबत त्याचा पत्रव्यवहार सुरू आहेच पण आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीचा आढावा घेत काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
‘देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना लॉकडाऊनसारखे पर्याय अवलंबले जात आहेत.
उध्दव ठाकरेंची परिस्थिती पाहून वाटतेय, की त्यांच्या हातात “राज्य दिलंय” की त्यांच्यावर “राज्य आलंय”? राज ठाकरेंची खोचक टिपण्णी ते आता राज्याला परवडणारे नाहीत. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो?’ असे म्हणत राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे 5 मागण्या केल्या आहेत.
या त्या ५ मागण्या आहेत.
महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी
सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी
राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी
लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी
राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या कालच्या संबोधनात पंतप्रधानांकडे लोकांना वैयक्तिक मदतीची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच कोरोनाला नैसर्गिक आपत्ती मानून त्या निकषांनुसार लोकांना वैयक्तिक मदत देण्यात यावी, असाही मुख्यमंत्र्यांच्या मागणीचा सूर होता.
महाराष्ट्रातील कोव्हिडचा वाढत्या प्रादुर्भावावर काय उपाययोजना करता येतील ह्यासंबंधी मा.राजसाहेब ठाकरे ह्यांनी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी ह्यांना एक पत्र लिहिलं आहे. ह्या पत्रात राजसाहेबांनी लसीकरणासोबत इतर आरोग्यविषयक बाबींवर अतिशय मोलाच्या सूचना केल्या आहेत. @PMOIndia pic.twitter.com/Potbew0KGP
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 14, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 14, 2021, 7:53 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY