इथे मृत्यूही ओशाळला… विद्युतदाहिन्या तापल्या, चिमण्या वितळल्या; स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कारासाठी रांगा
सुरत : कोरोनाच्या दुसरी लाटेने केवळ महाराष्ट्रच नाही, तर गुजरातच्या सुरतमध्येही अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनामुळे येथे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्याचे भयावह चित्र पुढे आले आहे. एवढेच नाही, तर सलग अंत्यसंस्कार सुरू असल्याने विद्युतदाहिनीचे धुरांडेही वितळू लागले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. गुजरातमध्ये कोरोना रुग्णांचे आकडे लपवले जात आहेत. रांगा रुग्णालये सोडून , स्मशानांसमोर लागत आहेत. पूर्वी सरासरी येथे दिवसाला दोन ते तीन अंत्यसंस्कार व्हायचे. आता एका एका रुग्णवाहिकेतुन 20 शव आणले जात आहेत. अत्तिशय परिस्थिती भयावह गुजरातची आहे. यामुळे धुरांडे थंड होत नाहीत, अति उष्णतेमुळे ते वितळत आहेत. त्याचप्रमाणे सुरतच्या रांदर आणि रामपुरा येथील स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारांसाठी रीघ लागलेली आहे.
वाढणाऱ्या मृत्यूंमुळे येथे 14 वर्षांपासून बंद असलेले तापी नदीच्या काठचे कैलास मोक्षधाम पुन्हा उघडण्यात आले आहे. तीन दिवसांत येथे 50 हून अधिक पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारांसाठी तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
मागच्या आठवड्यापासून शहरातील स्मशाभूमींमध्ये दिवसरात्र मृतदेह जळत आहेत. शहरातील अश्विनीकुमार, रामनाथ घेला या दोन स्मशानभूमींमध्ये मोठी रांग पाहायला मिळत आहे. जवळपास 16 विद्युतदाहिन्यांमध्ये दररोज 100 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या अविरत सुरू असल्याने त्यांच्यात बिघाड व्हायला सुरुवात झाली आहे. स्मशानभूमीत सध्या दिवसाकाठी 80 मृतदेह येत असल्याने सर्व विद्युतदाहिन्या अखंड सुरू आहे. सतत सुरू असल्याने विद्युतदाहिन्यांच्या चिमण्या उष्णतेने वितळल्या आहेत.यामुळे मोदीजी राजकारण सोडा, जीव वाचवा, अन्यथा नियती तुम्हांला माफ करणार नाही असे नागरिकारकडून आवाहन करण्यात येत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 14, 2021, 7:10 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY