Breaking News

केंद्र सरकारचा मोठा निर्णय: आता CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच थेट अकरावीला प्रवेश दिला जाणार 12 वीच्या परीक्षा देखील स्थगित,

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 14, 2021 6:42 pm
|

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा सुद्धा 4 मे पासून सुरू होणे अपेक्षित होते. आता CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच थेच अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नसतील तर त्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. या परीक्षा कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर घेतल्या जातील.

तर CBSE 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात 1 जून रोजी पुनरविचार करून निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षा घेणार असल्यास त्याच्या 15 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.असेही शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. दहावीच्या परीक्षांचा निकाल हा सीबीएससी बोर्डाने तयार केलेल्या ऑब्जेटिव्ह निकषांनुसार लावण्यात येईल आणि योग्य वेळी तो जाहीर करण्यात येईल.

CBSE च्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा 4 मे रोजी घेतल्या जाणार होत्या. परंतु, ऑल इंडिया स्टूडेंट एसोसिएशनच्या वतीने या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरण्यात आली. संघटनेचकडून शिक्षण विभागाला पत्र देखील पाठवण्यात आले होते. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी #CancelBoardExam2021 हॅशटॅगसह कॅम्पेन सुद्धा चालवले. CBSE बोर्डाच्या एकूण 30 लाख विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा दिली जाणार होती.

महाराष्ट्रात आधीच रद्द झाल्या परीक्षा

कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा परीक्षा रद्द करून थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. कोरोनाने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. अशात राज्य सरकारांकडून स्टेट बोर्डाच्या आणि इतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. काही राज्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय घेतला.

या आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले होते. अखेर हा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 14, 2021, 6:42 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *