Breaking News

Lockdown 2.0 | 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात लॉकडाऊन?आज ८.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी संवाद,

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 13, 2021 8:09 pm
|

मुंबई : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पहाता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री साडे आठ वाजता समाज माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार जनतेला काय सूचना देतात तसेच प्रशासकीय तयारी कशी आहे, याची माहिती देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री राज्यातील जनलॉकडाऊन एवढीच महत्त्वाची जबाबदारी राज्यावर कोरोना आटोक्यात आणण्याची आहे. 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 15 दिवस लॉकडाऊन करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार सुरु आहे. अजून यावरती मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत तसेच रविवारी टास्कफोर्स सोबत बैठक घेतली होती. त्याबैठकीत राज्यातील कोरोना स्थितीवर चर्चा देखील झाली. त्यापूर्वी 8 मार्चला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील संवाद साधला होता. राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्याबाबत लॉकडाऊन हा पर्याय असल्याचं मत तज्ञांनी मांडलं आहे. आजचा गुढीपाडवा आणि उद्या आंबेडकर जयंती झाल्यावर म्हणजे येत्या १५ एप्रिल पासून राज्या संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहावे लागणार आहे. सध्या लॉकडाऊनसाठी मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार करण्याचं काम सुरू आहे. त्याचा निर्णय करुन लॉकडाऊन बाबतच्या मार्गदर्शक सूचना आजच जारी करण्यात येतील, अशी सुत्रांची माहिती आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 13, 2021, 8:09 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *