परप्रांतीय मजूरांची गावी जाण्यासाठी धावपळ; मुंबईतील कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर गर्दी
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. राज्यात लॉकडाऊन संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इशारा दिलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून यावर मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू आहेत. दरम्यान आजच राज्यातील लॉकडाऊनविषयी महत्त्वाची घोषणा केली जाऊ शकते असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
दरम्यान , राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मिनी लॉकडाऊननंतर ही कोरोनाचा आकडा वाढत असल्याने सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचारात असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. कडक निर्बंधांमुळे आधीच अनेक व्यवसाय ठप्प झाल्याने कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यातच पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा फरफट होऊ नये म्हणून मुंबईच्या कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर परप्रांतिय मजुरांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली. लॉकडाऊन झाल्यास गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते या भीतीने आता मुंबईत वास्तव्याला असणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावी परतण्यासाठी कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्स रेल्वे स्थानक गाठलं आहे.
परप्रांतीय मजूरांची गावी जाण्यासाठी धावपळ; मुंबईतील कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर गर्दी#lockdown #mumbailockdown #maharashtralockdown #COVID19 pic.twitter.com/E82YRwmJnU
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) April 13, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 13, 2021, 3:59 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY