गुढीपाडव्यानिमित्त बाईक रॅली आणि मिरवणूका काढण्याला बंदी, गाईडलाईन जारी
मुंबई : मराठी नववर्षाची सुरूवात म्हणजे मराठमोळा सण गुढीपाडवा. उद्या याा निमित्ताने राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे . या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं शासन आदेशानुसार सूचित करण्यात आलंय.
काय आहेत नियम –
गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं शासन आदेशानुसार सूचित करण्यात आलंय.
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत,
कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.
गढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील.
तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. दरम्यान राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 12, 2021, 5:55 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY