“…तर तुम्हाला महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही”; संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं
मुंबई : कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरून भाजपची (BJP) सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. ही घटना देशाला एकसंध ठेवणारी नाही. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्याच राज्यात कोरोना हाताळणीत केंद्रीय पथकाला त्रुटी आढळतात. शिवाय भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातच कोरोना व्हायरस संसर्ग अधिक असल्याचे चित्र उभा केले जात आहे, असे राऊत म्हणाले.
रेमडिसीवर या इंजेक्शनचा देशभरात तुटवडा असताना ती गुजरात भाजप कार्यालयात मिळत आहेत. हवी तेवढी मिळत आहे. म्हणजे ही औषधं एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून ती मिळू शकतात. परंतू, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड राज्यांमध्ये रेमडिसीवर मिळत नाही, केंद्र सरकारची ही वागणूक अतिशय अमानुष असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.राज्यातील विरोधी पक्षाने याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे. परंतु, त्यांना केंद्र सरकारची (Modi govt) ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार उरणार नाही, असे मत शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.
केंद्रीय सचिव हे ज्या राज्यांची नावे घेत आहेत त्या ठिकाणी बिगरभाजप सरकार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचे सरकार तिथे कोरोना पळून गेला असे तंत्र या लोकांनी निर्माण केले आहे काय? असा सवालही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. कोरोना हे संकट आहे. अशा जगव्यापी संकटात सर्वांनी अत्यंत जबाबाजरीने आणि भान ठेऊन राहायला हवे. परंतू, तसे घडताना दिसत नाही
महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना व्हायरस वाढतो आहे. ही राज्ये कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव सांगतात. तसे असेल तर ते अपयश प्रथम केंद्र सरकारचे आहे. कोरोना व्हायरस विरुद्धची पूर्ण लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. त्यामुळे ही लढाई अपयशी ठरली तर ते केंद्राचं अपयश आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुनच कोरोनाबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. असे असूनही केंद्रीय सचिव कोरोना लढाईत राज्ये अपयशी ठरल्याचे म्हटले जात असेल तर ते केंद्राचे अपयश आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 12, 2021, 4:21 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY