“तुमच्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही” प्रविण दरेकर यांच्या टीकेला रोहित पवार यांंनी जोरदार पलटवार

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे सध्या अनियंत्रित परिस्थिती उद्भवली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे.त्यामुळे केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशी टीका प्रतिटीका केली जात होती. यावरून पुढे आता रेमडेसिवीर इंजेक्शनावरून राजकारण पेटताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी वेलफेअर फंडच्यावतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचं वाटप केलं होतं. तर त्याआधी भाजपच्या गुजरातमधील पक्ष कार्यालयात रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा आढळला होता. या प्रकरणावरून पुढे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे.रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला. यावर प्रविण दरेकर यांच्या टीकेला रोहित पवार यांंनी जोरदार पलटवार केला आहे.
काय म्हटले रोहित पवार
रोहित पवार यांनी म्हटले ,सन्माननीय प्रविण दरेकर साहेब रेमडेसिवीर बाॅक्स हे शरद पवार आणि राष्ट्रवादी वेलफेअर निधीतून सोलापूर व इतर जिल्ह्यातील गरीब,गरजू रुग्णांना प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मोफत देता यावेत,यासाठी दिले आहेत. तुमच्याप्रमाणे हे औषध पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.सर्वसामान्यांना शक्य ती मदत करता यावी म्हणून सर्वांसमोर हे औषध दिलं,पण आपल्यासारख्या जबाबदार पदावरील नेत्याकडून चोरीबाबत झालेला उल्लेख दुर्दैवी आहे आणि असे प्रश्न विचारण्यापेक्षा रेमडेसिवीरचा तुटवडा होऊ शकतो, हे माहीत असूनही आजवर निर्यात का सुरु ठेवली याचं उत्तर केंद्राकडून घ्या, असा सल्ला देखील त्यांनी रोहित पवार यांनी प्रविण दरेकर यांना दिला.
काय म्हटले प्रविण दरेकर
प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे की, रेमडेसिवीर बाबत “आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट”, अशी भूमिका नवाब मलिक यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोफत दिलेले रेमडिसिवीर चोरून आणले आहेत का? याबाबत नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं जोरदार पलटवार प्रविण दरेकर यांनी केला आहे. तुम्ही एवढे एवढेच निष्पक्ष असाल तर, रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 12, 2021, 2:54 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY