देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन
नांदेड : जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईत निधन झाले आहे. अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईत उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. ोरोना संसर्गामुळे त्यांची तब्बेत खालावली. गेल्या 12 दिवसांपासून अंतापूरकर यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना काही दिवसांपूर्वी करोनाचं निदान झालं होतं. स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अंतापूरकरांना कोरोनाचा अधिक त्रास होत होता. त्यामुळे त्यांना काही दिवसांपासून व्हेन्टीलेटरवर ठेवले होते. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाची काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून माहिती दिली.अंतापूरकर मंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय होते. 2009 आणि 2019 असे 2 वेळा ते देगलूर मतदार संघातून निवडून आले होते. मितभाषी आणि साधी राहणीमान अशी अंतापूरकर यांची ओळख होती. अंतापूरकर यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. अशोक चव्हाण यांनी “माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना,” अशी माहिती देत आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 10, 2021, 12:41 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY