Breaking News

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या कडक उंबरठ्यावर, राज्य सरकार कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 9, 2021 7:08 pm
|

मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण सापडत असून, शेकडोंच्या संख्येने मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली. त्यात लॉकडाऊन बाबत मत जाणून घेण्यात आले. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली असून वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. याच दरम्यान लॉकडाऊनसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मोठे वक्तव्य केले आहे.

याबाबत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे, कोरोनाची ही शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे. आज मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत हाच मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. येत्या तीन-चार दिवसात त्यासंदर्भात निर्णय होईल. तीन आठवड्यांचा हा लॉकडाउन कडक स्वरूपाचा असायला हवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत फक्त भाजी आणि अत्यावश्यक सेवासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा द्यावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.

तसेच राजेश टोपे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना परिस्थितीत जर सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल, असे म्हटले आहे. लॉकडाऊनच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, पण तो करावा लागू नये, अशी अपेक्षा आहे. त्याआधी आपण जर कोरोनाला रोखले तर आम्ही आनंदी आणि समाधानी असू. आम्ही सर्वोत्तम होईल अशी अपेक्षा करत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

आपण लॉकडाऊनच्या समर्थनात नसल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट करत सांगितले की, जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, डॉक्टरांची कमतरता जाणवू लागते, औषधांचा तुटवडा निर्माण होतो आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो, तेव्हा तात्काळ लॉकडाऊन जाहीर करणे हा नियम आहे. जेणेकरुन आपण सुविधा निर्माण करुन परिस्थितीचा सामना करु शकतो.

लॉकडाऊन मागचा कोरोनाची साखळी तोडणे हा मुख्य हेतू असतो. जगभरात आपण पाहिले तर १५ दिवस ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन हा गरजेचा असून त्याचे कडक पालन झाले पाहिजे. त्यानंतर त्या कालावधीचा फायदा होतो, असे राजेश टोपे यांनी सांगितले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 9, 2021, 7:08 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *