Breaking News

निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणारे नागरिक ‘सुपर स्प्रेडर’ ठरू शकतात, त्वरित निर्बंध घाला – मनसे

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 9, 2021 5:48 pm
|

मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत असताना दिसत आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. दरम्यान मनसेकडून महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. निवडणुका असणाऱ्या राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावण्यात यावे असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकतात. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 9, 2021, 5:48 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *