भाजपने उन्नाव बलात्कार आरोपीच्या पत्नीला दिले निवडणुकीचे तिकीट

लखनौ – उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान भाजपाने उन्नाव बलात्कारातील आरोपी माजी आमदार कुलदीप सेनगरच्या पत्नीला पंचायत निवडणुकीचे तिकीट दिले आहे. संगीता सेनगर भाजपाच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद होते. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.
गेल्यावर्षी भाजपाने पक्षातून बडतर्फ केलेल्या कुलदीप सेनगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने सेनगर यांना दोषी ठऱवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. १० लाखांचा दंडही ठोठावला होता. यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा कुलदीप सेनगर यांचा दावा आहे. दरम्यान २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 9, 2021, 1:25 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY