देशातील नागरिकांना धोक्यात टाकून केंद्र सरकारने लसीची निर्यात करणे योग्य आहे का? राहुल गांधी
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती दररोज बिघडत आहे. संक्रमितांची प्रकरणे रोज नविन विक्रम बनवत आहेत.दरम्यान ,कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता याच मुद्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत राहुल गांधी ट्वीट करून म्हणाले की, आपल्या देशवासीयांना धोक्यात टाकून लसीची निर्यात योग्य आहे का? यादरम्यान त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली राहुल गांधी म्हणाले की, वाढत्या कोरोना संकटामध्ये लसीचा अभाव ही एक गंभीर समस्या आहे, उत्सव नव्हे.
राहुल गांधी म्हणाले, “वाढत्या कोरोना संकटात लसीचा अभाव ही एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशातील नागरिकांना धोक्यात टाकून केंद्र सरकारने लसीची निर्यात करणे योग्य आहे का? केंद्राने सर्व राज्यांना कोणताही भेदभाव न करता मदत करावी. आपल्या सर्वांना एकत्रितपणे या महामारीचा पराभव करावा लागेल.’
दरम्यान, कोरोना लसीच्या कमतरतेबद्दल देशातील अनेक राज्यांनी केंद्र सरकारला माहिती दिली होती. राज्यांनी दिलेल्या या माहितीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या लसीसंदर्भात केंद्राची बाजू मांडली होती. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, “आता ही भीती संपवूया. कोरोना लसीचे 9 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. राज्यांमध्ये 4.3 कोटींचा साठा आहे. तुटवड्याचा प्रश्न आलाच कुठून? आम्ही सतत निगराणी करत आहोत, पुरवठाही वाढवत आहोत.”
तसेच, कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत आता अमेरिकेच्या मार्गावर आहे. देशात रुग्ण आढळण्याची संख्या वाढून 9.21% झाली आहे. म्हणजेच आता प्रत्येक 100 लोकांमध्ये 9 कोरोना संक्रमित आढळत आहेत. तीन आठवड्यांपूर्वी म्हणजेच 11 ते 17 या काळात रुग्ण आढळण्याचा वेग 3.11%, 18 ते 24 मार्चच्या काळात 4.46% आणि 25 ते 31 मार्चच्या काळात 6.04% या वेगाने देशात कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 9, 2021, 1:13 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY