Breaking News

पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही: अमृता फडणवीस

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 8, 2021 7:37 pm
|

मुंबई : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग अत्यंत झपाट्यानं वाढलेला पाहायला मिळत आहे. यावरूनच अमृता फडणवीस यांनी नुकतंच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, अगदी बिनधास्तपणे मनात जे असेल ते पोस्ट करत असतात. अनेकदा यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात. पण या ट्रोलिंगला न घाबरता अमृता यांनी त्यांचा हा बिनधास्तपणा कायम ठेवला आहे. त्यांच्या याच स्वभावाची झलक त्यांच्या या ताज्या Tweet वरून पाहायला मिळते आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये एक कोडं घातलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यानंतर या ट्विटला रिट्विट करत अनेकांनी या कोड्याचे उत्तर दिले आहे. आता तुम्ही सुद्धा पहा सोडवून कोडं सुटतंय का?


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 8, 2021, 7:37 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *