Breaking News

बार्शीत रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार स्टिंग ऑपरेशन द्वारे उघड , समोर आली धक्कादायक माहिती

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 8, 2021 4:48 pm
|

सोलापूर : कोरोनाच्या (corona) संकटात देखील रुग्णांना लुटण्याची वृत्ती पहायला मिळत आहे. एकीकडे रेमडीसिवीर इंजेक्शनची (ramdisever injection) वाढती मागणी लक्षात घेऊन इंजेक्शनच्या काळाबाजाराचा भांडाफोड सोलापूर जिल्ह्यातील (solapur district) बार्शी (barshi) येथे झाला . बार्शी शहरातील तुळशीराम रोडवर असलेल्या शहा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमध्ये रेमडीसिवीर या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचा दावा बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होलसेल औषध विक्रेते यांनी केला .

सदर स्टिंग ऑपरेशन मध्ये एक रेमडीसिवीर इंजेक्शनची किंमत ४ हजार रुपये असल्याचे मेडिकल स्टोअर वाला सदर तरुणाला बोलत आहे. त्याचबरोबर एकादा इंजेक्शन घेऊन गेल्यानंतर तो परत घेतले जाणार नाही. युवक काही पैसे कमी असल्याचे बोलत आहेत, मात्र पैसे कमी असल्यानंतर तो इंजेक्शन देता येणार नसल्याचेही बोलत आहे. दरम्यान,तरुणानी पैसे ठेवल्यानंतर मेडिकल स्टोअरवाला पैसे लवकर घेत नसल्याचे देखील दिसून येत आहे. मात्र, काही वेळाने तो पैसे घेतो आणि रेमडीसिवीरइंजेक्शन तरुणाला देतो. असं सदर स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून येत आहे.स्टिंग करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा होलसेल औषध विक्रेते यांनी यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सदर प्रकरणाची रीतसर तक्रार दिली असून, सदर स्टिंग ऑपरेशन केलेला व्हिडीओही त्यांना पाठवले असल्याची माध्यमांना माहिती दिली आहे.

दरम्यान, काही नफेखोर मेडिकल चालक काळ्या बाजारात चढ्या भावाने रेमडीसीविर इंजेक्शनची विक्री करत आहेत. एकीकडे सोलापुरात रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक रात्र-रात्र जागून काढत असल्याचे देखील समोर आले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 8, 2021, 4:48 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *