Maharashtra Corona Vaccine | लस वाटपात केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय का? आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. बाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही वाढ झाली आहे. देशात दिवसात एक लाखांहून अधिक नव्या बाधितांची नोंद होत आहे. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 59,907 रुग्णांची वाढ व 322 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोविड-19 लसीच्या तुटवड्याचा अतिशय गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलेल्या आरोपांनंतर आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.कोविड-19 लसींसंदर्भात केंद्राकडून प्रमाणापेक्षा कमी मदत मिळत असून सध्या केवळ 7.5 लाख लसी पुरवण्यात येणार आहेत. मात्र, मध्य प्रदेशमध्ये 40 लाख, उत्तरप्रदेश मध्ये 48 लाख, गुजरात 30 लाख आणि हरियाणा 24 लाख असे लसीकरणाचे वाटप झालेले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संवाद साधला असता यावर लवकरात लवकर पाऊलं उचलू असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
दरम्यान , आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दर आठवड्याला किमान 40 लाख कोविड-19 लसींचा पुरवठा करण्याची मागणीयांची केंद्राकडे केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, लसीचा साठा, पुरवठा, लसीकरण यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, लसीची वितरण व्यवस्था व्यवस्थित का नाही? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. देशातील सर्वाधिक रुग्ण ज्या राज्यात आढळून येतात, त्या राज्यात केवळ 7.5 लाख लसी आणि बाकी राज्यांना 40 लाख लसी का? असेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्रात दिवसाला 6 लाख लोकांना लस दिली जात आहे. हा रेट पाहता महिन्याला 1 कोटी लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे. लसींच्या तुटवड्यामुळे कित्येक जिल्ह्यांमधील लसीकरण आता ठप्प झाले आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लस न घेता नागरिकांना परतावे लागत आहे, ही बाब डॉ. हर्षवर्धन यांच्या निर्दशनास आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसंच मध्यम वर्ग अधिक फिरतीवर असल्याने त्यांचं लसीकरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे “व्हॅक्सिन हाच करोनापासून वाचण्याचा इलाज आहे. अमेरिकेपासून अनेक विकसित देशांनी १८ वयापासून लसीकरण सुरू केलं आहे. हा वयोगट सगळ्यात जास्त फिरणारा वयोगट आहे. तोच जास्त बाधित होतो. तोच इतरांना बाधित करतो. त्यातून संख्या वाढते”, रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर ऑक्सिजनची कमतरता भासू शकते. त्यामुळे प्रत्येक राज्यात ऑक्सिजनचा ‘बफर स्टॉक’ हवा, असल्याचेही त्यांनी म्हटले. सध्याच्या परिस्थितीत वाद न करता केंद्र आणि राज्याने हातात हात घेऊन काम करायला हवं, असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.दरम्यान, आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी आहे.
“WHO पासून अनेक आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी कोविड संदर्भातल्या कामगिरीविषयी आपलं कौतुक केलं आहे. पारदर्शीपणा आपण पाळला आहे. अॅक्टिव केसेस, कोविड केसेसबद्दल इथे प्रोटोकॉल पाळला जातो. इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, मला माहिती नाही. RT PCR आणि अँटिजेन टेस्टिंग आम्ही केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे करतो आहोत. यांचं प्रमाण ७०-३० टक्केवारी असायला हवी. उत्तर प्रदेशात ९० टक्के अँटिजेन टेस्ट केल्या जात आहेत. टेस्टिंगच्या लॅब वाढल्या आहेत. प्रति दशलक्ष १ लाख ९० हजार चाचण्या होत आहेत. सगळ्याच बाबतीत सांगितलं तसं केलंय. आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपांसारखी परिस्थिती अजिबात नाही”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी उत्पादक कंपन्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितले. रेमडेसिवीरचं राज्यात उत्पादन होत नाही. त्यामुळे शरद पवार रेमडेसिवीर कंपन्यांशी चर्चा करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी लवकरात लवकर रेमडेसिवीर उपलब्ध होईल, अशी आशा आहे. सध्या केंद्राच्या 30 टीम्स राज्यातील 30 जिल्ह्यात तपासणी करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 2:39 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY