“माझी सर्वांना विनंती आहे की…”; पवारांचं राज्यातील जनतेला आवाहन
मुंबई : देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. बाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही वाढ झाली आहे. देशात दिवसात एक लाखांहून अधिक नव्या बाधितांची नोंद होत आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना केसेसमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडलाय. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला कठोर पाऊल ऊचलावी लागतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
शेतकरी, कामगार, व्यापारी, हमाल, कष्टकरी अशा समाजातील सर्व घटकांना झळ बसली. भाजीपाल्यासारखा नाशीवंत माल तयार करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मालाच काय होणार ? हा प्रश्न उपस्थित झालाय. या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलं पाहीजे. याला आता पर्याय राहीला नाही. समाजातील सर्व घटकांना विनंती आहे की, आपल्याला वास्तव नाकारुन चालणार नाही. जनतेच्या हितासाठी काही अपरिहार्य निर्णय राज्य सरकारला घ्यावे लागतायत. या परिस्थितीला सामोरे जाताना सुचना डोळ्यासमोर घेऊन निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय राबवण्यासाठी तुमच्या सहकार्याची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी संपर्क केला. या संकटात संपूर्ण आरोग्य खातं महाराष्ट्राच्या पाठीशी आहे असं त्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 59,907 रुग्णांची व 322 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज शहरात 30,296 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 31,73,261 वर गेली आहे. सध्या राज्यात 5,01,559 सक्रीय रुग्णांवर उपोचार सुरु आहेत. आतापर्यंत एकूण 26,13,627 रुग्ण बरे झाले असून, 56,652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 12:17 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY