Breaking News

संजय राऊत यांच्यावर महिला निर्मात्याने केले गंभीर आरोप,थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मांडली कैफियत

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 7, 2021 9:26 pm
|

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका डॉक्टर महिलेने छळाचे गंभीर आरोप केले आहेत. 2015 मध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बेतलेला बाळकडू चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनीच संजय राऊतांवर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. स्वप्ना व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ आहेत. ‘द रॉयल मराठी एन्टरटेन्मेंट’ नावाच्या फिल्म प्रॉडक्शन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकही आहेत. २०१३ मध्ये त्यांनी जीवन फंडात मराठी पुस्तकही लिहिले आहे.

आता स्वप्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’चे सह-संपादक संजय राऊत मागच्या 8 वर्षांपासून आपल्या पक्षाचे वजन वापरून त्यांना शिवीगाळ करत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत आहेत. यामुळे मी खूपच त्रस्त झाले आहे… ‘ याबरोबरच पाटकर यांनी दोन पानांची पत्र लिहून पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेतेमंडळींना टॅग केले आहे. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये स्वप्ना पाटकर यांनी कुणी आपल्याला मारून टाकण्याआधी सहानुभूती नव्हे तर न्यायाची गरज आहे.

डॉ. स्वप्ना पाटकर आपल्या पत्रात लिहितात…

“पोलीस चौकशी करायला लावूनसुद्धा जेव्हा संजय राऊत यांचे समाधान होत नाही, तेव्हा मला त्रास देऊन, छळ आणि बदनामी करून माझे चारित्र्यहनन केले जात आहे. ते म्हणतात की, पोलिसांकडे गेलीस तरीही काहीही होणार नाही. 2013 मध्ये माझ्यावर 2 वेळा हल्ला झाला. तपास अजूनही सुरू आहे. कोणीही आरोपी मिळाला नहाी. 2014 मध्ये ACP प्रफुल्ल भोसले यांनी विनाकारण माझ्याविरुद्ध चौकशी सुरू केली. माझ्यावर संजय राऊत यांना खंडणी मागण्याचा आरोप केला. 2015 मध्ये माझा पाठलाग सुरू करण्यात आला. धमक्या मिळाल्या. मी कुणाशी बोलावे, कुणाशी नाही, यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला गेला. मी कुठे जातेय, काय करतेय- या सर्वांवर संजय राऊत यांचे लक्ष होते. मला रोज ईमेल पाठवून सांगावे लागायचे की, मी कुठे गेले होते, कुणाशी भेटले. ऐकले नाही तर एक नवी पोलीस केस तयार व्हायची.”

स्वप्ना पाटकर म्हणाल्या की, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना संजय राऊत यांच्या कृत्यांबाबत सांगितले, परंतु काहीही फायदा झाला नाही. त्यांनी मनसुख हिरेन आणि पूजा चव्हाण यांच्या संशयित मृत्यूंचा उल्लेख करत म्हटले की, जर त्यांचा मृत्यू झाला, तर ती आत्महत्या नसेल.

डॉ. स्वप्ना पाटकर यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून अनेक स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल पाठवल्यानतर आलेले अॅक्नॉलेजमेंट दिसू शकते. यासोबतच त्यांनी एका चॅटचे स्क्रीनशॉट शेअर करून दावा केलाय की, संजय राऊतच त्यांना मैसेज पाठवतात. त्यांनी मुंबईच्या झोन 8 चे DCP यांना ईमेलही पाठवला होता. त्या म्हणाल्या की, ट्विटरवर संजय राऊत यांनी त्यांना ब्लॉक करून ठेवलेले आहे.

कोण आहे स्वप्ना पाटकर?

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ‘बाळकडू’ या मराठी सिनेमाची निर्मिती झाली होती. त्या सिनेमाची निर्मिती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केली होती. स्वप्ना या प्रोफेशनली सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांची द रॉयल मराठी एंटरटेनमेंट नावाची निर्मिती संस्था असून त्याच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. याशिवाय त्यांनी 2013 मध्ये तिने मराठीमध्ये ‘जीवन फंडा’ हे पुस्तकही लिहिले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 7, 2021, 9:26 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *