Breaking News

लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरु, प्रकाश आंबेडकरांचा इशारा

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 7, 2021 6:36 pm
|

पुणे : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Crises) दिवसेंदीवस वाढतच चालले आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. विकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची (Corona Lockdown) स्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून राज्य सरकारवर करण्यात येत आहे .आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे.शासनाने खुलासा करावा की लॉकडाऊन कशामुळे लावता आहात. कोरोना झाल्यामुळे लॉकडाउन लावत आहात की कोरोना झाल्यामुळे माणसे दगावली अशी परिस्थिती आहे म्हणून लॉकडाऊन लावत आहात. असा सवाल प्रकाश आंबेडकर
यांनी केला आहे. ते म्हणाले , मुख्यमंत्र्यांना मानायचं की आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मानायचं हा मोठा प्रश्न आहे एकंदरीत दिसत आहे. प्रत्येक पक्ष आपला अजेंडा राबवितात का सरकार चालवत आहेत असं काही दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणताय चेंन ब्रेक करण्यासाठी आम्ही लॉकडाऊन लागू करत आहोत . पण तेथेही दुजाभाव दिसतो आहे काही दुकाने चालू तर काही दुकाने बंद अशी परिस्थिती आहे आणि हा भेदभाव का असं विचारलं तर सांगतात गर्दी होऊ नये म्हणून याकरिता लॉकडाउन लावत आहेत. मग भाजीपाला, मंडई गर्दी होते होत नाही का असा सवाल करत चैन ब्रेक करण्याचा प्रश्‍न कुठे उपस्थित झाला आहे असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी करत टीका केलीये . तसेच सरकारचे मनेजमेंट योग्य नाही. मॅनेजमेंट व्यवस्थित केले तर लॉकडाऊन करण्याची गरज नाही असा आंबेडकरांनी म्हटले आहे . तर महाराष्ट्रात कोवीड आहे आणि बंगाल मध्ये कोवीड नाही का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाऊन हे यावर उत्तर नाही असेही ते म्हणाले.

गेल्या वर्षी जे जम्बो कोविड सेंटर सुरुवातीला सरकार चालवत होते. ते नंतर खाबूगिरीसाठी नातेवाईक आणि एनडीओंना चालवायला दिले, अशी घणाघाती टीकाही आंबेडकरांनी राज्य सरकावर केलीय आहे . लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक भरडले जात आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. अन्यथा राजकीय दृष्टीनेच विचार करावा लागेल, असे आंबेडकर यांनी म्हटले .

राज्यातील नागरिक लॉकडाऊनला विरोध करण्याच्या तयारीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. लोकांनी विरोध करण्यापूर्वी राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय परत घ्यावा. सरकारने निर्णय मागे घेतला नाही तर अनेक लोक दुकाने सुरु करायला लागतील. तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. सरकारला आम्हाला अटक करायची असेल तर करा. पण आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारला दिला.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 7, 2021, 6:36 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *